Thursday, 16 October 2025

सरदार@150 एकता मोहिमेचा भव्य शुभारंभhttps://mybharat.gov.in भेट

 सरदार@150 एकता मोहिमेचा भव्य शुभारंभ https://mybharat.gov.in भेट

या मोहिमेअंतर्गत विकसित भारत पदयात्रा उपक्रमाद्वारे युवकांमध्ये देशभक्तीएकता आणि नागरी जबाबदारी जाणीवराष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणेनागरी सहभाग वाढविणे आणि युवकांमध्ये एकतेची व देशभक्तीची भावना रुजविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तराबरोबरच राज्यातही सरदार@150 एकता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रीय एकतेतील योगदानाचे स्मरण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे भारताचा सामाजिकसांस्कृतिक आणि आर्थिक उत्कर्ष साधणे व एकात्मता वाढवणे यावर भर असणार आहे. या मोहिमेत युवकांना सहभागी करून राष्ट्रनिर्माणात त्यांना सक्रियपणे सहभागी करणेदेशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागविणे ही मुख्य प्रेरणा आहे. राज्यात जिल्हा स्तरावर पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे.

 

 जिल्हा स्तरावरील पदयात्रा (31 ऑक्टोबर – 15 नोव्हेंबर 2025)

प्रत्येक जिल्ह्यात 3 दिवसांच्या कालावधीत 8 ते 10 कि.मी. पदयात्रा आयोजित करण्यात येईल. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करूनआत्मनिर्भर भारताची शपथ घेण्यात येईल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनक्रीडा विभाग, MY भारत, NSS, NCC तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करणार आहेत. क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकहरता आयोजक म्हणून असणार आहे.

निबंध आणि वादविवाद स्पर्धा,      सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये (नुक्कड नाटक)., नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे,स्वच्छता मोहिमांचा समावेश,     महिला कल्याण शिबीरे,   योग आणि आरोग्य शिबीरे, वोकल फॉर लोकल किंवा स्वदेशी उत्पादनांना चालना देणारे अभियान "गर्व से स्वदेशी" प्रतिज्ञा,शाळामहाविद्यालयांमध्ये निबंधवादविवादपरिसंवादपथनाट्ये, स्थानिक कलांवर आधारित कार्यक्रम-संगीतनृत्यलोकनृत्य इत्यादी, संस्था स्वदेशी मेळावे,         आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा

या उपक्रमासाठी सर्व नोंदणी MY Bharat Portal वर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. https://mybharat.gov.in/pages/unity_march  देशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सरदार@150 एकता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

अधिक माहितीसाठी युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार वेबसाईट: https://mybharat.gov.in भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi