इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या डिजिटल डॅशबोर्डचे
मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विभागीय डिजिटल डॅशबोर्ड विकसित केला आहे. या डॅशबोर्डचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री श्री. सावे म्हणाले, या डॅशबोर्डच्या माध्यमातून विभागाच्या कामगिरीचे एकत्रित व रिअल टाईम चित्र कळेल. यामुळे विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख, पारदर्शकता आणि निर्णयप्रक्रियेची क्षमता अधिक सक्षम होईल.
डॅशबोर्डच्या माध्यमातून योजना-निहाय व जिल्हानिहाय निधी वितरणाचे विवरण, लाभार्थी व वापरकर्त्यांची संख्या, योजना कव्हरेज व प्रगतीचे अनुक्षण तसेच विभागीय कार्यप्रदर्शन निर्देशक यांचा तपशील पाहता येणार आहे. यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढेल, तसेच धोरण व कार्यक्रम व्यवस्थापनासाठी माहिती आधारित निर्णय घेणे शक्य होईल.
हा डॅशबोर्ड विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणणारा आणि नागरिकाभिमुख प्रशासन साधणारा टप्पा असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment