साकत येथे पूर परिस्थितीमुळे अडकलेल्या नागरिकांना
सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
उपमुख्यमंत्र्यांकडून मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा
मुंबई, दि. २२ :- धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील साकत येथे मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाणी शिरले आहे. पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्क तुटला असून तिथे १२ नागरिक अडकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी वरुन साकत गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.
साकत गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवावे तसेच हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment