या करारामुळे शिक्षकांच्या गुणवत्तेत वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामामध्ये सुधारणा होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पद्धतीचा लाभ ग्रामीण ते शहरी सर्व शाळांना मिळेल, हवामान शिक्षण व डिजिटल कौशल्यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सज्ज करता येईल. यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि महाराष्ट्राची शिक्षणव्यवस्था अधिक समावेशक, गुणवत्तापूर्ण व जागतिक मानकाशी अनुरूप बनेल. राज्यातील शिक्षकांना केंब्रिज प्रेस आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षक विकास कार्यक्रम, सेल्टा व आयकेआय सारख्या जागतिक मान्यताप्राप्त पात्रता तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत के-12 शैक्षणिक साधने उपलब्ध करून शिक्षक क्षमता वृद्धी, दर्जेदार अध्यापन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल. तसेच या कराराद्वारे महाराष्ट्र शासनाला राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल. शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही जागतिक दर्जाचे संसाधन उपलब्ध होतील. शिक्षण प्रणालीत नवोन्मेष व गुणवत्ता येईल आणि राज्याच्या शिक्षणव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त होईल. हा करार महाराष्ट्रातील शाळांना 'भविष्यकालीन, समावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण' देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
00000
No comments:
Post a Comment