Thursday, 18 September 2025

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथकपणे काम करू

 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथकपणे काम करू

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन

 अतिवृष्टीमुळे नुकसान;  राज्य सरकार तात्काळ मदत देणार

 २०२३ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची गतीने अंमलबजावणी

 

छत्रपती संभाजीनगरदि.१७ (विमाका) :- मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मितीकृषिपायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करूअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात दिली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलातर्फे शस्त्र सलामीमानवंदनेनंतर ध्वजारोहण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi