Thursday, 18 September 2025

जिल्हा युवा पुरस्कारासाठी २५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी २५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. १८ :  राष्ट्र व राज्याच्या निर्मितीत युवकांची महत्वाची भूमिका असून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार योजना राबविण्यात येते. इच्छुकांनी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या वर्षी राज्यस्तरावर प्रत्येक विभागातून एक युवकएक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांची निवड केली जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप युवक-युवतींना रोख ₹१०,०००/-संस्थेला ₹५०,०००/-गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे राहणार आहे. गत तीन वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करून निवड केली जाणार असून इच्छुकांनी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रततीन पासपोर्ट फोटो जोडून बंद लिफाफ्यात खालील पत्त्यावर पाठवावेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगरशारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरसमता नगर पोलीस ठाणे शेजारीआकुर्ली रोडसंभाजीनगर समोरकांदिवली (पूर्व)मुंबई.

अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या क्रमांकाशी संपर्क साधावा. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगर तसेच संकेतस्थळावर  sports.maharashtra.gov.inउपलब्ध आहे.

मुंबई उपनगरातील युवकयुवती व नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव वेळेत सादर करावेतअसे जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांनी आवाहन केले असून राज्यातील जास्तीत जास्त संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा,  आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi