Thursday, 18 September 2025

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आव्हान

 जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आव्हान

 

मुंबईदि. १८ :  जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवत्तापूर्ण क्रीडा मार्गदर्शकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२४-२५ जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातून पुरुषमहिलादिव्यांग अशा खेळाडूंसह गुणवत्त क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार दिले जाणार आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  रश्मी आंबेडकर यांनी  केले आहे.

महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून खेळाडू व मार्गदर्शक यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव होणार आहे. पुरस्कारासाठी इच्छुक खेळाडूंनी व मार्गदर्शकांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगर येथून प्राप्त करून घ्यावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ असून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात सादर करावेत. अधिक माहितीसाठी मनीषा गारगोटे (मो. ८२०८३७२०३४) यांच्याशी संपर्क साधावाअसे जिल्हा क्रीडा अधिकारी  रश्मी आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi