Thursday, 18 September 2025

निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठा लढा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनिजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठा लढा उभारलायात स्वामी रामानंद तीर्थगोविंदभाई श्रॉफदिगंबरराव बिंदूरवीनारायण रेड्डीदेवीसिंगजी चव्हाणभाऊसाहेब वैशंपायनशंकरसिंग नाईकविजेंद्र काबराबाळासाहेब परांजपेकाशिनाथ कुलकर्णीदगडाबाई शेळकेविठ्ठलराव काटकरहरिश्चंद्र जाधवजनार्धन होरटीकर गुरुजीसूर्यभान पवारविनायकराव चारठाणकर अशा अनेक जणांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घेऊन काम केले. त्यांच्यासोबत असंख्य लोकांनी रझाकारांच्या जुलूमातून मराठवाड्याला मुक्त केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास १३ महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला मुक्ती मिळाली आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही, तर एकसंघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो.  या सर्व लोकांचा आदर ठेवत मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi