महसूल यंत्रणेने आपल्या क्षमतेचा वापर करुन
गरजूंना कमीत कमी वेळेत न्याय मिळवून द्यावा
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
----
कोकण महसूल विभागाच्या कामांचा आढावा
मुंबई, दि. ११ : राज्य शासन पारदर्शकतेने आणि गतिमानतेने लोकाभिमुख काम करीत आहे. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असून या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेचा वापर गरजूंना कमीत कमी वेळेत न्याय देण्यासाठी करून शासनाच्या धोरणाला पूरक कार्य करावे, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत कोकण महसूल विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विभागातील आमदार सर्वश्री दीपक केसरकर, निलेश राणे, विक्रांत पाटील, किरण सामंत, भास्कर जाधव, अबु आझमी, भाई जगताप, राजन नाईक, अनंत नर, मुरजी पटेल, हरून खान, तुकाराम काते, श्रीमती मनिषा चौधरी, चित्रा वाघ, विद्या ठाकूर, सुलभा गायकवाड यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment