‘नाबार्ड’ अंतर्गत सिंचन प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी
- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. ११ :- ‘नाबार्ड’ अंतर्गत होणाऱ्या सिंचन प्रकल्पांचे नियोजन, मंजुरी आणि कामे जलद गतीने करून या प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
नाबार्ड अंतर्गत (low hanging fruit project) प्रस्तावाच्या सद्यस्थितीचा आढावा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. गुणाले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव प्रसाद नार्वेकर, संजीव टाटू, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ज्या प्रकल्पांची कामे अंतिम टप्यात आहेत त्या प्रकल्पाच्या कामांना प्राधान्य द्यावे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच २०२५-२६ व २०२६-२७ मध्ये पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांचे कामे गतीने करून हे प्रकल्प एक वर्षात पूर्ण करण्याबाबत नियोजन होणे आवश्यक आहे. एका वर्षात पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांची वेगळी सूची करून त्यानुसार त्या प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. या प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याने या कामांना गती द्यावी. प्रकल्पांच्या कामांसाठी उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करावा, तसेच आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाईल
No comments:
Post a Comment