वाळू बाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तथापि कोकणातील भौगोलिक परिस्थिती पाहता या विभागासाठी धोरणात बदल करावा लागणार असल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून १५ दिवसात याबाबतची कार्यप्रणाली सादर करावी, असे निर्देश मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत वाळू चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा सप्ताह’ राबविण्यात येणार आहे, या दरम्यान मोहीम स्वरूपात पाणंद रस्ते आणि सर्वांसाठी घरे अभियानास पूरक उपक्रम राबविले जाणार आहेत. या पंधरवड्यात महसूल यंत्रणेने सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, असे निर्देशही मंत्री श्री बावनकुळे यांनी दिले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सादरीकरणाद्वारे कोकण विभागातील महसुली कामाच्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला. त्याचबरोबर सेवा पंधरवड्यादरम्यान करण्यात येणाऱ्या पाणंद रस्ते आणि सर्वांसाठी घरे अभियानाच्या तयारीबाबत तसेच विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबतची माहिती दिली. सामाजिक साहाय्याच्या लाभाच्या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी महसूलमंत्र्यांना दिली.
No comments:
Post a Comment