कोकण विभागातील देवस्थान इनाम जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी धोरण ठरविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी प्रारूप तयार करण्याच्या सूचना मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या. त्याचबरोबर कोकणातील महसूल विभागांतर्गत रिक्त पदे भरण्यासाठीची कार्यवाही तातडीने करावी, कोळीवाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना मालमत्ता पत्र देण्याबाबत कार्यवाही करावी, अकृषीक कर आणि सनद रद्द करण्याबाबत मुंबई आणि उपनगर जिल्ह्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवावा, कृत्रिम वाळूसाठी शासनाच्या निकषाप्रमाणे वाळू तयार करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वांना परवाने देण्यात यावेत, असे निर्देशही मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.
यावेळी मंत्री श्री.बावनकुळे यांनी उपस्थित आमदारांच्या सूचना विचारात घेऊन सर्व जिल्हाधिकारी तसेच प्रांत अधिकारी यांच्याकडून त्याबाबतच्या कामाचा आढावा घेतला. जी कामे प्रलंबित आहेत ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
0000
No comments:
Post a Comment