Monday, 22 September 2025

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल

 कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल

         - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांतील कारवाईत झिरो टॉलरन्स

            मुंबई, दि. 21 : कोणतीही महासत्ता कायदा सुव्यवस्थेशिवाय उभी राहू शकत नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात पोलीस व्यवस्थेच्या सुधारणांवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षणाबरोबरच अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यासंदर्भात राज्य शासनाने झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या 10 व्या स्थापना दिनानिमित्त भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर चर्चासत्राचे मुंबईतील पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उत्तरप्रदेशचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असीम अरूण, इंडियन पोलीस फाउंडेशनचे प्रमुख तथा मेघालयचे माजी राज्यपाल आर.एस. माशारी, फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ओ.पी.सिंह, राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह विविध राज्यातील पोलीस  अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी कायम उच्च दर्जा टिकवून ठेवल्याचा अभिमान आहे. पोलीस आज भारताच्या आर्थिक विकासावर चर्चा करीत आहेत ही अभिनंदनीय बाब असून, पोलीस दलात आणखी चांगले बदल घडविण्यासाठी आजच्या कार्यक्रमात होणारे विचार मंथन महत्वपूर्ण ठरेल. या विचारमंथनातून येणाऱ्या नवीन उपाययोजनांचा शासन सकारात्मक विचार करेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi