Monday, 22 September 2025

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी

अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 

मुंबईदि. २१ - फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर 17नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखेस 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटीशर्तीनुसार नाव नोंदणी करण्याकरता उपलब्ध आहेत. या संदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 

खाजगी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाहीयाची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी विद्यार्थी / शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावाअसे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi