जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सतेफाड मधील सुरत जटाळे यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून पाच एचपीचा पंप बसवला. या योजनेमुळे त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली. पंप बसवल्यापासून त्यांचे वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपयांवरून दीड लाख रुपयांपर्यंत गेले, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतीमध्ये घरातीलच तीन व्यक्ती काम करत असून मुलाच्या शिक्षणासाठी आणि पुन्हा शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी आलेल्या नफ्याचा उपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील बापकाळ येथील शेतकरी ताई किशोर सावंत म्हणाल्या की, पीएम कुसुम बी - मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये दोन एकर क्षेत्रासाठी तीन एचपीचा सोलर पंप बसवला आहे. यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वाढ झाली. त्याचबरोबर उरलेल्या विजेचा इन्हवर्टरच्या माध्यमातून घरात वापर करण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment