पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माई वस्ती पेठ येथील माधुरी धुमाळ यांनी पीएम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेत दहा मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प १० एकर मध्ये उभारला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वार्षिक पंधरा लाख उत्पन्न या प्रकल्पातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाकवड येथील चंदू पावरा या शेतकऱ्यांने पीएम कुसुम बी- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ७.५ एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप बसवला. त्यामुळे दिवसा वीज उपलब्ध होऊन पाण्याच्या उपलब्धतेमुळे मका, गहू, भुईमूग या पिकांची पेरणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील गोपाळ महल्ले यांनी पीएम कुसुम सी- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेत लाभ घेतला आहे. या सर्व प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला दरवर्षी पाच लाख रुपये मिळत असून या शेतकऱ्यांनी सतराशे लोकांना वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांची विजेची समस्या सुटली. यामुळे या भागातील शेतकरी दिवसा वीज उपलब्ध होत असल्यामुळे आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment