प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या प्रकल्पाच्या यशोगाथा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना प्रकल्पाची यशोगाथा प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील किकवारी येथील शेतकरी सुनील सिताराम काकुलते यांनी पीएम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत ४० एकर जमीन सिंचनाखाली आणली. यामुळे दरवर्षी दोन लाख रुपये उत्पन्न वाढले आहे. ५० ते ६० लोकांना यामुळे रोजगार प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील भेंडी महळ येथील शेतकरी तुषार वानखेडे यांनी १० मेगावॉट पीएम कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची योजना ६.५ एकरामध्ये राबवली. यापूर्वी रात्री वीज नसल्यामुळे अडचणी निमार्ण होत होत्या. शेतीला पाणी कमी पडत असल्यामुळे हरभरासारखे पीक घेतले जात होते. आता पपई आणि केळीचे पीक घेऊन ३५ हजार ऐवजी ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment