Friday, 19 September 2025

हवामान बदल पूर्णपणे रोखणे शक्य नाही. परंतु तो कमी कसा करता येईल आणि त्यासाठी बांबूची

 श्रीमती भुते म्हणाल्या कीहवामान बदल पूर्णपणे रोखणे शक्य नाही. परंतु तो कमी कसा करता येईल आणि त्यासाठी बांबूची भूमिका महत्त्वाची असणार आहे. बांबूचे अनेक फायदे असल्याने त्याच्याकडे पीक म्हणून न पाहता एक उत्पादन म्हणून पाहिले पाहिजे. शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांनाही बांबूचे फायदे सांगायला हवेत.

श्री. चौधरी म्हणाले कीईशान्य भारतात बांबू हा त्यांच्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. बांबू हे केवळ एक झाड किंवा पीक नाहीतर तो जीवनाचा भाग झाला आहे. भारतात बांबू उत्पादनाला चालना द्यायची असेल तर धोरण निर्मितीबरोबरच जनसमुदायाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. क्लायमेट चेंजकार्बन ट्रेडिंग हे शब्द गावकऱ्यांसाठी परके आहेत. बांबू लागवडीमुळे त्यांना कसा फायदा होणार आहे. ही माहिती त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बांबू उत्पादनाच्या खरेदी व मार्केटिंगवर भर देणे आवश्यक आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi