हवामान बदलाच्या मुकाबल्यासाठी बांबू लागवडीची महत्त्वाची भूमिका
- आंतरराष्ट्रीय बांबू परिषदेतील तज्ज्ञांचे मत
मुंबई, दि. 18 : हवामान बदलाशी लढण्यासाठी बांबू लागवडीसारखे नैसर्गिक उपाय करणे गरजेचे आहेत. त्यासाठी बांबूच्या उपयोगाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे, शासकीय धोरणांमध्ये योग्य समन्वय आणि स्थानिक लोकांचा सक्रिय सहभागही असणे महत्त्वाचे आहे, असे मत जागतिक बांबू परिषदेत तज्ज्ञांनी मांडले.
आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या "महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन" (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित बांबू परिषदेत “हवामान बदलाशी लढण्यासाठी बांबूचा उपयोग” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी या चर्चासत्रात विविध विषयांवरील तज्ज्ञांनी मत मांडले. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते, टेरा डो संस्थेचे सह-संस्थापक डॉ. मयंक जैन, बिट्स पिलानी संस्थेचे प्राध्यापक डॉ. अभिषेक शर्मा, नागालँड विद्यापीठाच्या ग्रामीण विकास आणि नियोजन विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. जयंत चौधरी, मालविका हर्बा फार्मचे संचालक दिनेश शर्मा यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. ज्युरियन सस्टेनेबिलिटीचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक कृणाल नेगांधी यांनी पॅनेल चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. "बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ" अशी संकल्पना घेऊन या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
No comments:
Post a Comment