‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी
राज्य शासन कटिबद्ध
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
· केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांनी राज्यांकडून घेतला स्वच्छताविषयक उपक्रमांचा आढावा
मुंबई, दि. २६ : नागरी भागातील स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियानाच्या बरोबरीने डीप क्लिन ड्राईव्ह, शून्य कचरा असलेली शहरे, सार्वजनिक शौचालये परिसर सुशोभिकरणासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा यशस्वीपणे राबविण्यासाठी राज्य सरकारचा नगरविकास विभाग कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
केंद्रीय गृहनिर्माण, शहरी विकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील विविध राज्यांमधील शहरी भागातील स्वच्छताविषयक कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्यावेळी मंत्रालयातून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री तोखान साहू, प्रकल्प संचालक रुपा मिश्रा तसेच विविध राज्यांचे नगरविकासमंत्री, प्रधान सचिवांशी केंद्रीयमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
No comments:
Post a Comment