पूजा, प्रसाद सामुग्रीसह बाप्पाला शैक्षणिक साहित्य अर्पण करा
गणेशोत्सव महासंघ आणि विदर्भ मंदीरचे गणेशोत्सव मंडळ व गणेशभक्तांना आवाहन
मुंबई,२६-(प्रतिनिधी )- गणेशोत्सवात, गणरायाचरणी पूजा प्रसादाच्या साहित्यासह , शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळांचे विश्वव्यापी संघटन असलेल्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि विदर्भ वैभव मंदिर यांनी राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना केले आहे.
श्रीगणेशाचे उद्या २७ ऑगस्ट २०२५ रोजी आगमन होत आहे महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावेळी आकर्षक रोषणाई, देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. राज्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व व पक्ष संघटनांकडून स्तुत्य असे उपक्रमदेखील राबविले जातात.याचाच एक भाग म्हणून गणेशभक्तांनी दर्शनाला जाताना पूजेच्या व प्रसादाच्या वस्तुसह आपापल्या परीने वह्या, पेन पेन्सिल स्कूल बॅग वापरात नसलेले जुने मोबाईल, टॅब पुस्तके, आदी शैक्षणिक साहित्य गणरायाचरणी अर्पण करावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपल्या मंडळाच्या वतीने गणेशभक्तांना तसे आवाहन करावे गणेश मंडपात बॅनर लावावे , या माध्यमातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील विद्यार्थी , आर्थिक दुर्बल तसेच ,आदिवासी विद्यार्थ्यांना वितरित करावे असे आवाहन अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्याध्यक्ष सुहास आडिवरेकर प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत आणि विदर्भवासी मुंबईकरांची शिखर संस्था ,विदर्भ वैभव मंदिर संस्थेचे अध्यक्ष अशोक बारब्दे, सरचिटणीस गणेश नागे,संजीव बारब्दे,पुरुषोत्तम भुयार, प्रभाकर आडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान .सदर या उपक्रमात सहभाग देण्यासाठी व सहकार्यासाठी ९३७२३४३१०८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या एक वही एक पेन अभियानचे प्रणेते राजू झनके यांनी अभियानच्या वतीने केले आहे

No comments:
Post a Comment