महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा
एकत्रित साहित्यातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाड्मय प्रकाशित
मुंबई, दि. २६ : क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या एकत्रित साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत जाईल. या साहित्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा मिळून यशस्वी होण्याचा मार्ग मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाड्मयाचे प्रकाशन करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाज्योती संस्थेमार्फत ह्या महावाड्मयाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments:
Post a Comment