Thursday, 28 August 2025

स्वच्छ भारत’ अभियान सुरु केले, या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणालेऑक्टोबर २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत’ अभियान सुरु केलेया अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे हे अभियान आता लोकचळवळ झाली आहे. ही स्वच्छतेची लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु असून मुंबई शहर-उपनगरात राबविलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह’ मोहिमेमुळे स्वच्छतेला गती मिळाली आहे. शून्य कचरा असलेली शहरेसार्वजनिक शौचालयाच्या परिसराचे सुशोभिकरण असे विविध उपक्रम राज्य शासन राबवित आहे. राज्यात केंद्राच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० राबविण्यात येत असून वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालयांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत.

एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्य ३५८ शहरांसाठी १६५६ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प उभारणी प्रस्तावित असल्याचे सांगतानाच २०० मैला उपसा वाहने लवकरच खरेदी करण्यात येणार आहेततर बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापनासाठी १० प्रकल्पांची उभारणी प्रस्तावित असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi