अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय
मौजे अनिक, चेंबूर येथे शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासंदर्भात अल्पसंख्याक विकास विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महाविद्यालय निर्मितीनंतर आवश्यक शैक्षणिक पदांची निर्मिती, पदभरती, देखभाल दुरूस्ती याचीही तरतूद करण्यात यावी. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे असलेले अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे. मान्यता असलेल्या ११ पदांची भरती तत्काळ करावी.
No comments:
Post a Comment