अल्पसंख्याकाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना राबविण्यात यावी. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दरवर्षी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी विद्यार्थ्यांची मर्यादा ठरवावी, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजातील मुलांना उच्च व परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.
यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख,महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे, क्रीडा आयुक्त शीतल तेली, उपसचिव सुनील पांढरे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, उपाध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्याक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ग.पी.मगदूम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment