बांगलादेशी घुसखोर, नक्षल यांचा बिमोड
१ हजार ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ३६५ नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. नक्षल कारवायांवर नियंत्रण ठेवून त्यांचा खात्मा करण्यात यश आलंय असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २०२३ मध्ये २२, २०२४ मध्ये १९ तर मे २०२५ पर्यंत १३ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत २८ नक्षलवादी मृत्युमुखी पडले असून त्यापैकी त्यांच्या आठ प्रमुख नेत्यांचा मृत्यू झाला आहे तर आत्ता मे अखेर पर्यंत सात नक्षलवादी मरण पावले आहेत. यावर्षी एकूण ७ नक्षल गुन्हे झाले यामध्ये सात नक्षलवादी ठार झाले. १३ जणांना अटक झाली तर २२ जणांनी आत्मसमर्पण केले.
No comments:
Post a Comment