नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
गैरव्यवहार चौकशीसाठी विशेष चौकशी पथक
- पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १८ :- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैर व्यवहाराची सर्वंकष चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक गठित करण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री श्री. रावल म्हणाले, या समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण), छत्रपती संभाजी नगर विभागीय सहनिबंधक यांचा समावेश असणार आहे. समितीने ३० दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment