रुग्णालयांमध्ये यांत्रिकी स्वच्छता
राज्यातले ३२ जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर युनिट अशा ३८५ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिकी स्वच्छता सेवा राबवण्यासाठी २ मार्च २०२१ मध्ये ५४ कोटी ५४ लाख एवढ्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, २०२२- २३ मध्ये राज्यातल्या एकूण ५०३ आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळाद्वारे स्वच्छता सेवा करण्यासाठी ७७ कोटी ५५ लाख रुपये एवढ्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु विहित कालावधीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहेत. १८ सप्टेंबर २०२३ च्या ‘जीआर’ नुसार जागेच्या क्षेत्रफळावर आधारित राज्यातल्या एकूण २५०३ आरोग्य संस्थासाठी एकत्रित ६३८ कोटी इतक्या रकमेची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पूर्वी हे काम मनुष्यबळाद्वारे व्हायचे. आता ते यांत्रिकी पद्धतीने होईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सदस्यांनी उपस्थित केलेल्या इतर मुद्द्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.
No comments:
Post a Comment