Monday, 21 July 2025

पीसीएमसी क्षेत्रातील भूखंड फ्री होल्ड करण्याबाबत सकारात्मक

 पीसीएमसी क्षेत्रातील भूखंड फ्री होल्ड करण्याबाबत सकारात्मक

- मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १७ : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या भूखंडांना फ्री होल्ड’ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले.

सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणालेशासनाने ११ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या निर्णयान्वये सिडको व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून भाडेपट्ट्याने देण्यात आलेले भूखंड फ्री होल्ड करण्यास मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित निवासी भूखंड फ्री होल्ड करण्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला होता. वित्त विभागाने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असून महसूल व वन विभाग तसेच विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन प्रस्ताव फेरसादर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. महापालिकेकडून आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi