‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी
- उपमुख्यमंत्री अजित पवार
§ डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या अटीत शिथिलतेसाठी
प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबई दि. ३० : राज्यात हाताने मैला उचलण्याची प्रथा बंद करण्यासाठी राज्यात ‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ ही मोहीम सुरू करण्यात आली असून, या माध्यमातून गटारे, सिवेज लाइन, सेप्टिक टाक्या यांची सफाई यांत्रिकीकरणाच्या मदतीने केली जाणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीची अट २५ वर्षांवरून २० वर्षे करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.
No comments:
Post a Comment