Friday, 18 July 2025

नवी मुंबई महानगरपालिकेने “सुपर स्वच्छ लीग सिटी” पुरस्कार पटकावला

 नवी मुंबई महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार पटकावला

 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गटात ( ठाणे जिल्हा )  नवी मुंबई महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार पटकावला आहे. पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्वीकारला.

 50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात (पुणे जिल्हा) लोणावळा नगरपालिकाने20,000 ते 50,000 लोकसंख्येच्या गटात ( सांगली जिल्हा) विटा नगरपालिकाने, ( पुणे जिल्हा) सासवड नगरपालिका आणि ( अहिल्यानगर जिल्हा)देवळाली प्रवरानगर नगरपालिका तर 20,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात ( सातारा) पाचगणी नगरपालिका आणि ( कोल्हापूर)पन्हाळा नगरपालिका  या शहरांनी सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळवले.

 ( पुणे जिल्हा) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 7 स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस ही दोन्ही मानांकनंही मिळवली आहेत. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महानगरपालिकानगरपालिकांच्या टीमसह पुरस्कार स्वीकारले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi