Friday, 18 July 2025

स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा-भाईंदर मनपा देशात प्रथम

 स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा-भाईंदर मनपा देशात प्रथम

·         राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

·         नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी स्वीकारले पुरस्कार

नवी दिल्ली17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा-भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण नगरविकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळप्रधान सचिव नगरविकास विभाग-2 डॉ. के.एच.  गोविंदराजराज्य मिशन डायरेक्टर  स्वच्छ महाराष्ट्र (शहरी) नवनाथ वाठ उपस्थित होते.

            स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनामध्ये ( ठाणे जिल्हा ) मिरा भाईंदर महानगर पालिकेने 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त राधा बीनोद शर्मा त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले.

कराड नगरपालिका देशात दुसरी

कराड नगरपालिकाने 50 हजार ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले आहे. हा पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह मुख्य अधिकारी प्रशांत वटकर यांनी स्वीकारला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi