Saturday, 24 May 2025

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारीचा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतला आढावा

 पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारीचा

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतला आढावा

 

मुंबई21 : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामकाज सुरळीत होण्यासाठी नियोजन योग्य करण्याच्या सूचना दिल्या.

विधानभवनात पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारी संदर्भात आढावा झाली. यावेळी सचिव (१) जितेंद्र भोळेसचिव (२) मेघना तळेकरसचिव (३) श्री आठवले(4) शिवदर्शन साठ्ये, सहसचिव नागनाथ थेटेउपसचिव रविंद्र जगदाळेअवर सचिव सीमा तांबेअवर सचिव आशिष जावळे उपस्थित होते.

आढावा बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शाखानिहाय कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच विनंती अर्ज समिती व सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणे तदर्थ समिती कामाचाही आढावा घेतला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi