Saturday, 24 May 2025

पुणे व पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेने पूररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागेचा विकास करावा

 पुणे व पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेने पूररेषा नियंत्रित करून

अतिरिक्त जागेचा विकास करावा

-         नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

     मुंबईदि. 21 : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या नद्यांची पुररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागा विकासासाठी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने गुजरात राज्याच्या धर्तीवर रिव्हर बंडिंगचा पर्याय अभ्यासून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिकेच्या पूररेषा बाधित क्षेत्रातील नव्या इमारतींचा विकासजुन्या इमारतींचा पुनर्विकास व पूर्ण क्षमतेने टि. डी. आर वापर अनुज्ञेय करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली.

बैठकीस आमदार महेश लांडगेआमदार शंकर जगताप तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्तमुख्य अभियंतासंचालकनगररचना पुणे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi