Tuesday, 22 April 2025

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अद्ययावतीकरणावर भर आवश्यक

 भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अद्ययावतीकरणावर भर आवश्यक

-  विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

▪ विधानभवनातील प्रस्तावित कामांचा घेतला आढावा

 सर्वसमावेशक नियोजनावर भर देण्याचे निर्देश

नागपूरदि. 21 : विधानभवनाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता यात काळानुरूप अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. यात पर्यावरणपूरक सुविधासर्वसमावेशक नियोजन यावर भर देत सर्व कामांची कालमर्यादेत पूर्तता करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.  

विधानभवन नागपूर येथील प्रस्तावित कामे व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर दूरदृश्यप्रणालीद्वारे तर विधिमंडळाचे सचिव -1 जितेंद्र भोळेसचिव-3 विलास आठवलेसहसचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी ऋतुराज कुडतरकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसेमुख्य अभियंता दिनेश नंदनवार  यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

नागपुरातील आमदार निवास येथे व्यापक बदल आवश्यक आहेत. अनेक वर्षांपासून विस्तार झालेला नाही. येथील पूर्ण एफएसआय वापरून आमदार निवासाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

आमदार निवास आणि विधानभवन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. प्रशासकीय कामात सुसूत्रता यावी यासाठी ही ठिकाणे विधिमंडळाच्या अखत्यारित असण्याची गरज आहे. यासाठीची तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सभापती श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

सिव्हिल लाईन्स परिसरातील 160 खोल्याचे बांधकाम अनेक वर्षांपूर्वी झाले आहे. या ठिकाणी पूर्ण एफएसआय वापरून बांधकाम करण्याचे नियोजन आहे. हिवाळी अधिवेशनासाठी येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गरजा लक्षात घेता निवासव्यवस्थेत सुसूत्रता येण्याची गरज आहे. विधिमंडळाची इमारत वर्षभर सुस्थितीत राहावी यासाठी देखभाल दुरुस्तीचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासकीय व विधिमंडळ कामकाजाच्या दृष्टीने मंत्री तसेच राज्यमंत्री यांच्यासाठी कार्यालयीन दालनाची गरज लक्षात घेतली पाहिजे. यात आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत सुलभता असणे आवश्यक आहे. ही सर्व काम येत्या अधिवेशनापूर्वी होतील यासंदर्भात आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. आवश्यकतेप्रमाणे तात्पुरती दालने व व्यवस्था करण्यात यावी असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी  विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी शासकीय मुद्रणालय, 160 गाळेआमदार निवासविधानभवन परिसराची पाहणी केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi