सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. सोयाबीन खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफची ५८६ केंद्र सुरू केले आहेत. आत्तापर्यंत १ लाख ८९ हजार ४५० मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे. ही गेल्या पंधरा वर्षातली सर्वाधिक विक्रमी खरेदी आहे. राज्यात दि. १२ जानेवारी पर्यंत खरेदी सुरू ठेवणार आहोत आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
राज्यात हमीभावाने कापूस खरेदी साठी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाने राज्यात १२२ खरेदी केंद्र मंजूर केली आहेत. त्यामध्ये अमरावती व नागपूर विभागात ६२ केंद्रांचा समावेश आहे. कापूस खरेदी साठी राज्यात अजून ३० खरेदी केंद्र सुरू करावीत अशी केंद्राकडे मागणी केली आहे. आतापर्यंत ३८ लाख १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment