नदीजोड प्रकल्प संजीवनी ठरणार
राज्यातील प्रादेशिक समतोल राखत सिंचन क्षेत्र वाढवण्यात येत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सिंचनाचा अनुशेष भरून काढायचा. दुष्काळावर मात करायची आहे. राज्यात जून २०२४ अखेरीस १४ लाख ४० हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सध्या ८१ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे. विदर्भासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प संजीवनी ठरणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा या ६ जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये ७ लाख ८५ हजार हेक्टर अनुशेष होता. जून २०२३ अखेर ७ लाख १२ हजार हेक्टर अनुशेष दूर झालाय. पुढच्या दोन वर्षांत अकोला आणि बुलढाण्याचा अनुशेषही दूर होईल. आम्ही नेटाने अनुशेष दूर करतोय, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment