निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री.आर.एस.बेलवंशी जिल्ह्यात दाखल
धाराशिव दि.२८( माध्यम कक्ष) भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री.आर.एस.बेलवंशी आज जिल्ह्यात दाखल झाले आहे. श्री.बेलवंशी यांचा मुक्काम तुळजापूर येथील विश्रामगृहातील रायगड सूट येथे राहणार आहे.त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३२५१६४८०५ हा आहे, त्यांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते सकाळी ११ वाजताची निश्चित केली आहे. आज श्री.बेलवंशी यांच्या आगमनप्रसंगी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
No comments:
Post a Comment