निवडणूक निरीक्षक (सामान्य) गोपाल चंद जिल्ह्यात दाखल
धाराशिव दि.२८( माध्यम कक्ष) २४२ - उस्मानाबाद आणि २४३ - परंडा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री.गोपाल चंद, (भा.प्र.से.) यांचे आज जिल्हयात आगमन झाले आहे.त्यांचा मुक्काम व कार्यालय शासकीय विश्रामगृह, शिंगोली येथील वेरुळ या सूटमध्ये आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२३४१३६ हा असून त्यांचा भ्रमणध्वनी नंबर ९०२१५५५३४९ हा आहे. निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्याशी निवडणूकविषयक प्रश्नाबाबत भेटीची वेळ ही सकाळी ९ ते सकाळी ११ वाजताची आहे.
No comments:
Post a Comment