Tuesday, 29 October 2024

उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी 'सुविधा 2.0' मोबाईल ॲप

 उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या

परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी 'सुविधा 2.0' मोबाईल ॲप

 

मुंबईदि. 28 भारत निवडणूक आयोगाने (ECI) 'सुविधा 2.0' हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे.  यापूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होतेपण आता नवीन अ‍ॅपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

 सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणेप्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणेअर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रियानिवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

 हे अ‍ॅप अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi