Saturday, 24 August 2024

महानिर्मितीचा २५ मेगावॉट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार, महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा क्षमता ४२८ मेगावाट

 महानिर्मितीचा २५ मेगावॉट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार, महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा क्षमता ४२८ मेगावाट

 

मुंबई, दि.२४ :  महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये साक्री-१ (२५ मेगावॉट)साक्री-२ (२५ मेगावॉट) आणि साक्री-३ (२० मेगावॉट) चा समावेश आहे. यापैकी साक्री-१ येथे २५ मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम मेसर्स गोदरेज आणि बॉयस या विकासकाने इ.पी.सी. (अभियांत्रिकी खरेदी आणि उभारणी तत्वावर) हा प्रकल्प विकसित केला असून क्रिस्टलाईन पद्धतीचे सौर पॅनेल आहेत. या प्रकल्पाची  कॅपॅसिटी युटीलायझेशन फॅकटर (सी.यू.एफ.) २०.५९ टक्के असून वार्षिक वीज निर्मिती ४५.०९ दशलक्ष युनिट अपेक्षित आहे.  

२१ ऑगस्ट  रोजी हा सौर प्रकल्प कार्यान्वित करून  २२०/३३ के.व्ही. शिवाजीनगरसाक्री उपकेंद्राशी यशस्वीरित्या जोडण्यात आला. साक्री-१ प्रकल्पामुळे ५० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता  ४२८ मेगावॉट इतकी झाली आहे. 

 

साक्री-१ प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

या प्रकल्पासाठी ५२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून याचा प्रकल्प खर्च ९३.१२ कोटी इतका आहे.  या प्रकल्पातून उत्पादित वीज ही खुल्या बाजारात विकण्यात येणार  आहे.  

 

"साक्री" महानिर्मितीचे सोलर हब

साक्री येथे महानिर्मितीचा १२५ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मागील सुमारे दहा वर्षांपासून कार्यरत आहे. त्यात साक्री-१,,३ सौर प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकाच ठिकाणी सुमारे १९५ मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या या  सौर प्रकल्पामुळे साक्री महानिर्मितीचे "सोलर हब" म्हणून नावारूपास येणार आहे.  

 

महानिर्मिती पॉवर ट्रेडिंग क्षेत्रात

जुलै २०२४ पासून महानिर्मितीने सेझ बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड,पुणे समवेत १५ मेगावॉट सौर वीज वितरणाचा करार केला आहे. 

 

प्रगतीपथावर सौर ऊर्जा प्रकल्प

साक्री-१ येथे २५ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम मेसर्स गोदरेज एन्ड बोएस कंपनी तर साक्री-२ हा २५ मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प टाटा पॉवर सोलर सिस्टिम साक्री-३हा २० मेगावॉट स्थापित क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम  मेसर्स स्वरयू पॉवर करीत असून लवकरच हे दोन्ही  प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

 

ऊर्जामंत्र्यांनी केले महानिर्मितीचे  अभिनंदन

साक्री-१ येथे २५ मेगावॉट स्थापित क्षमतेचा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी महानिर्मिती अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.  महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी संचालक(प्रकल्प) अभय हरणे आणि (नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि नियोजन)चमुचे तसेच मेसर्स गोदरेज एन्ड बॉयस च्या अधिकारीअभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.

००००

 

Mahagenco's Sakri-1  25MW Solar Power Project  Commissioned

Generated Solar Power will be sold in Open market

 

Now Mahagenco's Total Solar installed capacity is 428 MW

 

Mumbai August 24, 2024 : Mahagenco has undertaken the construction of a Solar power project with a total capacity of 70 MW at Shivajinagar, Sakri Taluka in Dhule District which include, Sakri-1 (25 MW), Sakri-2 (25 MW) and Sakri-3 (20 MW).  Out of these, the construction of a 25 MW Solar power plant at Sakri-1 was carried out by M/s Godrej & Boyce, a EPC developer.  (on Engineering Procurement and Construction basis) with crystalline solar panels.  The capacity utilization factor (CUF) of this project is 20.59 percent and the annual power generation is expected to be 45.09 million units.  

 

Sakri-1 was commissioned on 21st August and connected to 220/33 KV  Shivajinagar Sakri sub station successfully. This project has provided employment to 50 people.  Now the total Solar power installed capacity of Mahagenco has reached 428 MW.

 

Features of Sakri-1 Solar Project:

52 hectares of land has been acquired for this project and the project cost is 93.12 crores.The power generated from this project will be sold in the Open market.  

 

"Sakri" Mahagenco's Solar Hub

 A 125 MW solar power project of Mahagenco at Sakri has been operational for the last ten years.  After the completion of Sakri-1,2 & 3 solar projects, this solar project with an total installed capacity of about 195 MW at one place will make Sakri known as the "Solar hub" of Mahagenco.  

 

Mahagenco in Power Trading Sector

 From July 2024, Mahagenco has entered into an agreement with SEZ Biotech Services Private Limited, Pune for distribution of 15 MW of Solar power. 

 

Solar Power Project in Progress

Development of 25 MW Solar power plant at Sakri-1 by M/s Godrej & Boyce Company, Sakri-2 is a 25 MW Solar power project by Tata Power Solar System, Sakri-3, a 20 MW installed capacity solar power project by M/s Swarayu Power.  Both the projects are expected to be operational soon.

 

 

 

 

Energy Minister Congratulated Mahagenco

The Deputy Chief Minister and Energy Minister of the State Shri Devendra Fadnavis congratulated  officers and employees of the  Mahagenco for successfully commissioning of 25MW Solar project. 

 

Dr.P.Anbalgan, Chairman and Managing Director of Mahagenco has congratulated the Director (Projects) Abhay Harne and (Renewable Energy Projects and Planning) Team as well as the officers and engineers of M/s Godrej & Boyce.

 

 

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi