Saturday, 24 August 2024

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसह दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसह नदयाळ उपाध्याय

स्वयंम योजनेंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ

 

            मुंबईदि.२२ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पंडित दनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना आणि ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले आधार योजनेसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

             या दोन्ही योजनांतर्गत उच्च शिक्षणाचे द्वितीयतृतीय आणि चतुर्थ वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत, तर प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक, मुंबई शहर, पुष्पलता घटारे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi