Tuesday, 23 July 2024

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

 समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना

 सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

 

            मुंबईदि. २२:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय आज येथे घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावाअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विषयावर सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस आमदार सर्वश्री भरत गोगावलेज्ञानेश्वर म्हात्रेकिशोर दराडेजगन्नाथ अभ्यंकरमाजी आमदार ॲड. मनीषा कायंदेतसेच शिक्षक प्रतिनिधींचे शिष्टमंडळ आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीशिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठीदर्जेदार शाळांसाठी ही मंडळी काम करतात. या सर्वांना न्याय द्यायचा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाबाबत अन्य राज्यांत काय परिस्थिती आहेयाचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम ही समिती करेल. यात या शिक्षक प्रतिनिधींचाही समावेश राहील. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आमदार सर्वश्री म्हात्रेअभ्यंकरदराडे आणि माजी आमदार ॲड. कायंदे यांचा समावेश राहणार आहे.

            बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवराशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलशिक्षण आयुक्त सूरज मांढरेसमग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक आर. विमला आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi