Monday, 22 July 2024

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना उपयुक्त

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना उपयुक्त

- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

'दिलखुलासव 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात विशेष मुलाखत

 

            मुंबईदि. 22 : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात सांगितले.

            महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व स्वावलंबी करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी  आवश्यक पात्रतायाबाबतची प्रक्रिया यासंदर्भातील सविस्तर माहिती, महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातील  मुलाखतीत दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखतमंगळवार दि. 23बुधवार दि.24 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 24 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi