सावळी-सदोबा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सावळी-सदोबा येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र या संस्थेचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रुपांतरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या संस्थेकरीता लागणाऱ्या ३४ पदांनाही बैठकीत मान्यता देण्यात आली. संस्थेकरीता लागणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चापोटीच्या ४ कोटी ५९ लाखांच्या तरतुदीस देखील मान्यता देण्यात आली.
No comments:
Post a Comment