औद्योगिक विभागांमधील नागरी जमीन कमाल धारणा अन्वये
सूट देण्यात आलेल्या जमिनींसाठी अभय योजना
औद्योगिक विभागांमधील नागरी जमीन कमाल धारणा अन्वये सूट देण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्क व व्याजासाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील नाजकधा कलम २० खालील औद्योगिक प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या जमिनींचे दि. २३.०६.२०२१ पूर्वी त्याच प्रयोजनार्थ हस्तांतरण झालेले असल्यास, अशा प्रकरणी केवळ शेवटच्या हस्तांतरणासाठी हस्तांतरणाच्या दिनांकास लागू असणाऱ्या नाजकधाच्या धोरणानुसार हस्तांतरण शुल्काची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम आकारण्याचा तसेच सदरची रक्कम शासन जमा झाल्यानंतर अशा क्षेत्राच्या इतर हक्कातील नाजकधा कलम २० च्या नोंदी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment