साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे
आंतरराष्ट्रीय स्मारक घाटकोपरला
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील चिरागनगर, घाटकोपर येथे सार्वजनिक निकडीचा प्रकल्प म्हणून उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यासाठी 305 कोटी 62 लाख 29 हजार 173 इतका खर्च येईल. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत हे स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, चिरागनगर, घाटकोपर असे नाव देण्यात येईल.
-----०-----
No comments:
Post a Comment