Wednesday, 25 October 2023

*घरात गेल्यावर कटकट/चिडचिड/ओरडाओरड का करू नये??* 👇🏼👇🏼👇🏼

 *घरात गेल्यावर कटकट/चिडचिड/ओरडाओरड का करू नये??*

👇🏼👇🏼👇🏼

*वास्तु*

केवढी *पवित्र जागा!*


जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. 

*ती वास्तू फक्त आनंदी नसावी, समाधानी असावी. आनंद भौतिक पातळीवर असतो, समाधान आत्मिक पातळीवर असते.*

 *साखर, लिंबू, मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ, साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते.* 


*.* 


आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात.


*" CONDUCT OF PARENTS IS EDUCATION OF CHILDREN..!"*


मुले अनुकरणप्रिय असतात. *आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडाओरडा घराचा “उकिरडा" करतो*

 आणि 

वास्तुतज्ज्ञ समस्येच्या मुळाशी न जाता फक्त *अतार्किक, अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुचवितो आणि निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्चून मग पस्तावतात.* अरे 

*कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे तुम्हाला शक्य वाटते का आणि पटते का?*

 *तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.* 

ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जन करून मुलांना हातभार लावावा. 


*रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.* माळ घेऊन जप करणारी वृद्ध माणसेही आदरणीय वाटतात. *मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आई-वडिलांशी खूप नम्रतेने वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये.* सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे. आपणच जनरेशन गॅप कमी करावी. *सुनेने सुद्धा सासरी साऱ्यांना असा लळा लावावा, की सून माहेरी गेली की सुनं सुनं वाटलं पाहिजे.* घरात मेणबत्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलाचे निरांजन ओवाळून औक्षण करावे.  *भोजनाचे वेळी आनंदी वातावरण ठेवावे. पत्नी जेवली का विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावे,* एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्या. एकजण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे. 

*गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसे सारे शांत होईल.चालतानाही घरात पाय आपटू नयेत. शांतपणे वस्तू हाताळाव्यात.* 


पुरुषांनीही घरात नीटनेटके राहावे. सतत फक्त बायकांनीच सदाफुलीसारखे टवटवीत राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.


"  अशी राहाते *समाधानी वास्तु!*


*तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ आणि करा आपली वास्तुदेवता प्रसन्न अन् समाधानी..!!*


*👇🏻घरातील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा मॅसेज जाऊ द्या आणि प्रत्येक घर सुखी समाधानी होऊ द्या👆*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi