Tuesday, 16 August 2022

ध्वजारोहण

 स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्तविधान भवन येथे ध्वजारोहण.

मुंबई, दि.15: विधान भवन, मुंबई येथे आज स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, राहूल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.


       या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) तथा वि.का.अ. अनिल महाजन, उप सचिव विलास आठवले, शिवदर्शन साठ्ये, ऋतुराज कुडतरकर, मेघना तळेकर, राजेश तारवी, ना.गो.थिटे, अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. विधानमंडळाच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या वास्तूचे सौंदर्य उजळून निघाले आहे.


000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi