Tuesday, 16 August 2022

शुभेच्छा

 पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा


           मुंबई दि. 15 : पारशी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असून देशाच्या विकासातील पारशी समाजाचे महत्त्वही अधोरेखीत केले आहे.


पतेती सण व पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘व्यापार ही पारशी बांधवांची अंगभूत कला असल्यामुळे देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. समाजातील अनेक यशस्वी उद्योगपतींनी युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक दायित्वचे भान राखत सामाजिक उपक्रमांमधील त्यांचा सहभागही उल्लेखनीय आहे.’


यंदाचा पतेती सण व नववर्ष सर्व पारशी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल, अशा भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi